Posts

मेहरूण आनंदघराची १० वर्ष...

Image
आज २ जानेवारी २०२४. आज मेहरूण च्या आनंदघराला १० वर्ष पूर्ण झाली...! विश्वास बसत नाही, कि तब्बल दहा वर्ष! वर्धिष्णू संस्था स्थापन झाली तेव्हा पाहिलं आनंदघर मेहरूण ला उघडण्यात आलं. या दहा वर्षाच्या प्रवासात बरेच चढ- उतार आलेत. खूप गोष्टींच्या अनुभव आमच्या मुलांनी आणि आम्ही घेतला. आज सकाळी आल्यापासून आमच्या खूप चर्चा चालू होत्या. धावपळ चालली होती. कि, आज काय नवीन करायचं ? आपल्याला आनंदघराचा foundation day साजरा तर करायचा आहे. पण नुसत ‘भेळ पार्टी’ करण्यात मज्जा नाही. काहीतरी नवीन करावं ? आम्ही तिघीही (शीतल, निशा व प्रणाली) डोक्यावर बोट ठेवून विचार करत होतो , तेवढ्याच आम्हांला एक कल्पना सुचली. असं काहीतरी करूया कि , ‘मुलं त्यांचा आणि आनंदघराचा भूतकाळ बघू शकतील ? ’ आम्ही लागलो कामाला. ‘आनंदघराचे सर्व जुने video शोधून काढले आणि काही activities ठरवल्या ’ . आता आमची जादूची पोटली खाजीण्यानी भरलेली होती. तितक्याच आत्मविश्वसाने आम्ही आनंदघराची वाट पकडली. आनंदघरात पोहचलो. मुलांची गर्दी तिकडे जमलेली होती. आमच्या हातात projector बघून मुलं विचारात पडली व प्रश्न विचारू लागली? “ताई आज आड

आनंदघराचं ग्रंथालय

  आनंदघराचं ग्रंथालय वाचन गंमत असते. वाचता येणाऱ्यांसाठी आणि नव्याने वाचायला शिकणाऱ्यांसाठीसुद्धा. वाचन शिकण्यासाठी प्रेरणा महत्वाची असते. पुस्तकं वाचनासाठीची प्रेरणा जिवंत ठेवतात. वस्तीबाहेरचे बरेच अनुभव जे मुलांपर्यंत येऊच शकत नाहीत, अशा अनुभवांपर्यंत मुलांना पोहोचवण्याचे काम पुस्तकं करतात. पुस्तकांसोबत शिकणं आणि शिकवणं दोन्ही मजेदार होतं. अलीकडेच आमच्या आनंदघरात ग्रंथालय आलंय. मुलांना आवडतील अशी खूप वेगवेगळी पुस्तके वर्गात नेली. मुलांसमोर पसरून ठेवली. प्रचंड उत्सुकतेने मुलांनी प्रत्येक एक पुस्तक बघितलं. ही पुस्तके आपण घरीसुद्धा घेऊन जाऊ शकतो हे कळल्यावर मुलांना खूप आनंद झाला. आम्ही सर्वांनी मिळून ग्रंथालयाची नियमावली बनवली. पुस्तकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल चर्चा केली. देव- घेव कार्ड म्हणजे काय, ते का वापरायचं हे समजून घेतलं. लगेचच देव-घेव कार्ड बनवले. मुलं हळूहळू पुस्तकं घरी घेऊन जाऊ लागली. पुस्तकं नेताना आणि आणताना कार्डमध्ये न चुकता नोंद करू लागली. अप्रत्यक्षपणे ग्रंथालयाची प्रणाली मुलांच्या लक्षात आली.   बरं, मग आता पुस्तक वाचलं तर ताईला त्यातल्या गमतीजमती सांगायला नकोत? पुस्

When your alumni join as an Educator…

Image
Anita was just 10 years old when she started coming to Anandghar. One of our 1st batch student. Her father works as a sanitary worker and her mother is a homemaker. Anita is the 3rd child of her parents. 3rd girl before they had a son. Always neglected in the household. In the initial days she always wanted our complete attention and when we were unable to do so she used to cry, curse all of us. But as she grew she became more and more calm, confident, expressive.  By the time Anita joined Anandghar her elder sister was already married at the age of 15. Later due to regular conversations with her parents, they agreed to not look for marriage for their other daughters before they could turn 18. They let their 2nd daughter Sunita complete her 12th. Sunita got married in 2020 when she was 20 years old. Anita passed 10th grade exams in 2020. Last year she completed her 12th. Currently Anita is pursuing Bachelor of Arts from Jalgaon.  Yesterday, Anita joined us as an Educator. She is going

A picture speaks louder than the words...

“We had never thought that we could dream of a better future but now our girls are not only seeing the dreams but are also determined to achieve those.” Last month we celebrated our 10th Foundation Day. Our friends, supporters, family members came to Jalgaon to be part of the celebrations. We started the day by visiting Anandghar where people got an opportunity to meet and spend some really quality time with the children and community members as well. We had also planned an event in the evening. There were chief guests, performances by children. But we thought that rather than talking about the impact of Anandghar let's ask our parents and children about what they think. Two ladies sitting on the stage as panelists are Asha Tai and Lata Tai. One of them works as a rag picker and the other sells fish in the community. One of them is also a proud single mother of 2 children. What binds them together is their unparalleled commitment towards letting their daughter’s study rather than p

आनंदघरातली मासिक पाळी अभ्यासक्रमाची सुरुवात..

Image
या शैक्षणिक वर्षापासून आनंदघरात आम्ही मुलींसोबत तसेच महिला पालकांसोबत मासिक पाळी या विषयाला घेऊन एक संपूर्ण अभ्यासक्रम राबवायला सुरुवात करत आहोत. नुकतेच या संदर्भातले पहिले सत्र समता नगर आनंदघरात झाले. या सत्राविषयी आणि अनुभवाविषयी  आनंदघरातली फेलो एज्युकेटर निशा मसराम हिने लिहिलेला हा लेख. नमिताने ‘मासिक पाळीचे’ सेशन आम्हां Educators सोबत घेतल्या नंतर उस्तुकता लागली होती की कधी आम्ही एकदा मुलीसोबत हे सेशन घ्यायला सुरुवात करू. आता जुलै महिन्यात पहिल सेशन घ्यायचं आहे हे ठरल्यानंतर आमची सेशनची तयारी चालू झाली. मुलीशीं बोलणे. किती मुलींची पाळी येते? किती मुलींची पाळी पुढच्या सहा महिन्यात चालू होणार? दोन्ही मुली मिळून एकूण किती मुलींपर्यंत ही माहिती पोहचणार आहे? किती मुलींना लिहिता वाचता येत अशी बरीच माहिती एकत्र करून, ‘पहिलं सेशन interact ive कस असणार ? मुली सेशन बद्दल कसे react करणार ? आम्ही त्यांचा उत्साह व रस टिकवू शकणार काय ? अशी बरीच प्रश्न डोकात येऊन गेली. सेशनच्या तीन दिवसंआधी मुलीशी याविषयावर बोलायचं ठरवलं. मुलींना जेव्हा कळलं की ताई ‘मासिक पाळी विषयावर’ आपल्याशी बोलणार आहे’

आनंदघरातील तारे - हर्षल

Image
मरीमाता मंदिराच्या परिसरात रिकामटेकडी माणसंपूर्वी पत्ते खेळत बसलेली असायची, नाहीतरी पैसे लावूनइतर खेळ चाललेले असायचे. इथेच बाजूला समाज-मंदिराची एक छोटी बांधलेली होती. या खोलीत तिथल्याच एकाच बांधकामाच सामान पडलेलं होतं. आनंदघरासाठी ही खोली द्यायला हे तयार नव्हते. पावसाळ्यात आनंदघर बंद ठेवावे लागायचे पण पत्त्याचा डाव मात्र या खोल्यांमध्ये बिनदिक्कतपणे सुरु असायचा. लोकांना शिक्षणापेक्षा पत्ते जास्त महत्वाचे वाटायचे. याच अंगणात आनंदघर सुरू झालं आणि परिसराचं चित्र पालटू लागलं. सुरुवातीला आम्ही तिथे बसलो तरी आम्हाला न जुमानणारी ही माणसं आता आम्ही आलोय हे दिसताच स्वतःचं सामान आवरून बाहेर पडायला लागली. पत्त्यांची जागा आता चिमुरड्यांच्या लगबगीनं घेतली. मरीमातेचं अंगण लहान मुलांनी गजबजून जायला लागलं.  एक दिवस एक मुलगा आमच्याजवळ आला आणि म्हणाला,  “सर, उद्यापासून मी पण येऊ का?” अर्थात, आम्ही त्याला लगेच हो म्हणून सांगितलं. तो परत जायला निघाला तेव्हा मी त्याला म्हटलं, “अरे,तुझं नाव तरी सांग.” “हर्षल”, तो म्हणाला. अशा रीतीनं हर्षल आमच्याशी जोडला गेला.. हर्षल तेव्हा आठवीत होता. अंगकाठी अगदी बारीक. घर

आनंदघरातील तारे - प्रतीक्षा & रोशनी

Image
आनंदघराच्या संपूर्ण प्रक्रियेतून आजपर्यंत ५००हुन मुलं-मुली गेल्या. यातल्या सगळ्यांचीच एक वेगळी कथा होती/आहे. प्रत्तेकाच्या अडचणी वेगळ्या, आवडी-निवडी वेगळ्या, प्रत्तेकात कुठली तरी कला दडलेली. मात्र या सगळ्यात काही जण मात्र संपूर्ण प्रक्रियेत स्वतःचं वेगळ स्थान निर्माण करून राहिले. याची कारण प्रत्तेक वेगळी वेगळी होती. काही कचरा वेचण्याच दुष्टचक्र मागे टाकून शाळेत जायला लागले, तर काहींची प्रचंड इच्छा असतानाही त्यांना अपरिहार्य कारणाने पुन्हा एकदा त्याच चक्रात जाव लागल. बहुतांश जळगावात टिकले, राहिले तर काही रातोरात जळगाव सोडून निघून गेले. अनेक प्रश्न तसेच सोडून. अश्याच काही आनंदघरातील तारांबद्दल... प्रतीक्षा आणि रोशनी प्रतीक्षा वय वर्ष ६, एकदम बारीक. मध्यंतरी तिला म्हणालो,“अशीच बारीक होत राहिलीस तर काही दिवसांनी गायब होऊन जाशील.” असं काही आपण म्हणालो, कीती तिच्या नेहमीच्या सवयीने होsहोssहोsss करून हसणार आणि “ताई, सर मला उगीच त्रास देता” अशी माझी तक्रार प्रणालीकडे करणार. प्रतीक्षा आणि तिचा ५ वर्षांचा भाऊ, तिच्या आईसोबत कचरा वेचायला पहाटे-पहाटे बाहेर पडणार ते थेट दुपारी परत येणार. मग थोडी झो